सोलापूर प्रतिनिधी
श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूल येथील इयत्ता नववीची विद्यार्थिनी कुमारी अमृता शृंगारपुरे हिची भंडारा येथे होणाऱ्या वीस वर्षाखालील वयोगटासाठी राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली असून सदर स्पर्धा 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
सदर स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाचे चेअरमन मा. श्री धर्मराज काडादी व श्री. सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे पालक सदस्य, डॉ. श्री.राजशेखर येळीकर, श्री.भीमाशंकर पटणे, श्री गुरुराज माळगे व श्री मल्लिकार्जुन कळके यांनी तिच्या यशाबद्दल अभिनंदन केले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. योगेश राऊत पर्यवेक्षक श्री. शिवराज बिराजदार तसेच क्रीडा शिक्षक श्री. पवन भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.