शहापूर/ ठाणे प्रतिनिधी
आदिवासी कातकरी मुला मुलींची अनुदानित आश्रमशाळा बाबरे ता. शहापूर येथे ऑइल अँड नॅचरल गैस कॉर्पोरेशन कंपनी अंतर्गत कंप्युटर ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन प्रा.जोगेंद्र कवाडे सर माजी खासदार लोक सभा, माजी आमदार व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीयअध्यक्ष यांच्या शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी फक्त कातकरी मुला- मुलीची आश्रमशाळा हा आदिम जातीच्या एका जमातीला समाज्याच्या मुख्य प्रवाहात आणणारा शैक्षणिक प्रकल्प आहे असे काम करणाऱ्या ए. बी. एम. समाज प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मात्र येथील मुलाना पुन्हा दहावीनंतर शैक्षणिक सुविधा या विभागात सहजगत्या मिळत नाहीत आणि यामूळे गळती सुरु होते म्हणूनच या शाळेमध्ये कातकरी विध्यार्थीसाठी आर्ट्स, सायन्स व कॉमर्स कॉलेज पुढील वर्षापासून सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या माध्यमातून मी प्रयत्न करून मंजुरी मिळवून देईल असे जाहीर आश्वासन दिले.
या पुढे बोलताना ते म्हणाले , या वैविध्यपूर्ण शैक्षणिक प्रकल्पामध्ये ठाणे, पालघर व नाशिक जिल्हयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी आहेत याचेही कौतुक केले आपला विकास शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही हे आपल्या परिवर्तनाचे महानायक शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले यांनी वेळोवेळी चळवळी उभ्या करून सिद्ध केले आहे. या महानायकाचा वसा घेऊन या संस्थेचे संस्थापक सिताराम गायकवाड गेली 40 वर्षे काम करीत आहेत. त्यांचे अभिनंदन करतानाच त्यांनी युवा पिढीकडे संस्थेचा कारभार सोपवून सध्या सर्वत्र सत्ता संघर्षाचे वारे वाहत असताना सिताराम गायकवाड यांनी एक नवीन आदर्श घालून दिला आहे. असे मला वाटते यावेळी ONGC चे अनुसूचित जनजाती व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जागेश सोमकुअर यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की त्याच्या संघटनेच्या माध्यमातून कंपोनंट प्लॅन च्या अंतर्गत ते अनेक संस्थांना मदत करतात मात्र सिताराम गायकवाड व त्यांची संस्था गेली अनेक वर्ष जेव्हढी आमची मदत त्या ही पेक्षा तो प्रकल्प होण्यासाठी इतर मदतही गोळा करून शोषितांच्या शिक्षणासाठी काम करीत आहेत व म्हणून एक महिन्यापूर्वीच ONGC च्या माध्यमातून आम्ही डॉ. जब्बार पटेल यांच्या शुभ हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन त्याचा सन्मान व सत्कार केलेला आहे. कोरोना मध्ये केलेले उत्कृष्ट काम व मल्टिनॅशनल कंपनीच्या मदतीने शाळेची भव्य इमारत उभी करून परिवर्तनाच्या नवी दिशा व नवीन आशा भावी पिढीसाठी मिळणार आहे याची आम्हाला खात्री आहे. या प्रसंगी उल्हासनगर नगरपालिकेचे माजी कॉन्सीलर प्रमोद टाले, ए. बी. एम. संस्थेचे अध्यक्ष समीर गायकवाड, सरचिटणीस अतुल भडांगे, स्वप्नील जाधव संघटक इ मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
या कार्यक्रमासाठी ONGC चे व्ही. टी वानखेडे, डी. डी. कटारे, व्ही.यु. गायकवाड, तसेच ए. बी .एम. संस्थेचे कार्याध्यक्ष आर. एस. जाधव, शीतल गायकवाड, पूनम भडांगे, सूर्यकांत भडांगे, संतोष पडवळ, सुशील जाधव ,जिल्हास्तरीय महिला दक्षता समितीच्या सदस्या तथा शाळेच्या मुख्याध्यापिका आशा नवनाथ रणखांबे तसेच आश्रम शाळेचे सर्व शिक्षक आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पडवळ यांनी केले.