सोलापूर प्रतिनिधी
सोलापुरातील बहुचर्चित जुनी मिल जागेच्या १३७ एकर जागेसाठी कुमार शंकर करजगीने जुनी मिल बेकार कामगार ,वारसदार आणि जनहित संघर्ष समितीची (F -२१८१) १९८८ मध्ये स्थापना करून ८०० मेंबर्स कडून जागेबाबत पैसे गोळा करून, तसेच डेव्हलपमेंट चार्जेस, शेअर सर्टिफिकेट के. के. असोसिएट्स या नावे अधिकच्या रकमा घेऊन माननीय मुंबई उच्च न्यायालयातून १९९८ ला पाच लॉटमध्ये ही जमीन मिळवली. परंतु जागेचा ताबा घेताना बोगस उमा सहकारी संस्थेच्या नावे घेऊन पुढे त्याच्या १ ते १४ अशा बोगस संस्था स्थापन केल्या. कोणत्याही संस्थेला नॉमिनी नसतो, तरीसुद्धा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना हाताशी धरून कुमार करजगीने उमा सहकारी संस्थेच्या नावे संस्थेचे सभासद नसलेल्यांना जागा विकण्याचा सपाटा लावला. उमा संस्थेच्या नावे दाखवलेली जागा आजही शेत जमीनच आहे. त्याच्या १५ फाउंडर मेंबर्सना ही जागा दिल्या गेलेल्या नाहीत .२०१८ पर्यंत ही जागा कुमार करजगीच्या वडिलांच्या नावे होती व त्यानंतर आज ही जागा त्यांच्या चार मुलांच्या नावे आहे. आज पर्यंत या जागेचे फक्त प्रारुप नकाशे आहेत, त्यामुळे या १३७ जागेच्या कुठल्याही खरेदी, विक्री ,बांधकाम करता येत नसताना व त्यावर आरक्षण असताना महानगरपालिकेतील बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटे खरेदी ,विक्री, बांधकाम परवानगी काढली. या जागेचा स्वतंत्र सातबारा उतारा कोणाकडेही नाही. या जागेत चालणाऱ्या कोणत्याही शाळा, कॉलेज अथवा इमारतींचा वापर परवाना नाही. येथील द स्क्वेअर बिझनेस सेंटर, नागेश करजगी ऑर्किड स्कूल व ज्युनिअर कॉलेज, शरद चंद्र पवार महाविद्यालय, संभाजी शिंदे प्रशाला ,मोरारजी पेठ यांच्याकडे वापर परवाना नाही.संभाजी शिंदे प्रशालेची खरेदी विष्णुपंत कोठे यांनी जागा मिळण्याच्या आधीच १९९७ साली केली आहे. या जागेत अनेक माजी महापौर, सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी, वकील, डॉक्टर अशी मंडळी बोगस खरेदीखत व बांधकाम परवान्यावर राहत आहेत.
आज पर्यंत कोट्यावधी रुपयाचा टॅक्स भरल्या गेलेला नाही. या जागेतील निराळे वस्ती जवळील उमा टावर या इमारतीचा एनओसी रेल्वे खात्याकडून रद्द करून त्यावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना केले गेलेले आहे. जुनी मिल ट्रस्टच्या या जागेत राजकमल सर्कस ,यशराज मोटर्स ,गादी कारखाना, पार्किंग ,मनोरंजन नगरी ,काही व्यावसायिक गाळे अनाधिकृतपने चालू आहेत. याबाबत वारंवार सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार करून देखील त्यावर सोयीस्कर रित्या डोळेझाक केल्या गेलेली आहे. ट्रस्टची ही जागा असिस्टंट चारिटी कमिशनर, सोलापूर यांच्याकडे रजिस्टर केलेली आहे. भूमापन कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही जागा कुमार करजगीने बोगस उमा सहकारी संस्थेच्या नावे नॉमिनी म्हणून लावून घेतली आहे व त्याबाबत जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख यांच्याकडे ट्रस्ट तर्फे तक्रार दाखल केलेले आहे. २००६ साली जॉईंट चारिटी कमिशनर, लातूर यांनी कुमार करजगी व त्यांची संपूर्ण कार्यकारणी भ्रष्ट कारभार साठी कायमस्वरूपी बरखास्त केलेली आहे व त्यांना ट्रस्ट मधून काढून टाकण्यात आलेले आहे. तसेच २०१३ ला सोलापूर जिल्हा न्यायालयाने २०१७ मध्ये जॉईंट चारिटी चारिटी कमिशनर, पुणे यांनी या जागेबाबत कुमार करजगी व त्याच्या हस्तकांनी कोणतेही व्यवहार करू नयेत अशी सक्त ताकीद दिलेली आहे. कुमार करजगी २०१७ सालापासून जुनी मिल घोटाळ्यात जामिनावर असून जामीनातील शर्तींचा भंग केल्यामुळे डिसेंबर २०२२ मध्येच जामीन रद्द करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केलेला आहे. त्यामुळे १३७ एकर जागेचे खरेदी ,विक्री, लिज असे व्यवहार कुमार करजगी व त्यांच्या हस्तक २००६ सालापासून करू शकत नसताना सुद्धा ही जागा मी दान देतो किंवा मेंबर्सनी ही जागा घ्यावी, पत्रकारांना ,पोलीस, एक्स सर्व्हिस मनला मोफत घरे बांधून देतो अशा खोट्या अफवा कुमार करजगी वारंवार पसरवीत आहे. ज्यांच्या पैशावर ही जागा घेतल्या गेली त्यातील कोणत्याही सभासदांना ही जागा मिळालेली नसल्याने व संस्थेवर सक्षम कार्यकारी मंडळ नेमण्यासाठी रविवार, दि.२७/०८/२०२३ रोजी सायंकाळी पाच ते सात दरम्यान समाज कल्याण केंद्र ,रंगभवन ,सोलापूर येथे जुनी मील ट्रस्टच्या सभासदांची तातडीची सभा श्री औदुंबर आकुडे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. संदीप आडके यांनी बोलावलेली आहे. अधिक माहितीसाठी ९८२२८०७००७ येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुमार करजगी ,सोलापूर महानगरपालिकेतील बांधकाम विभागातील या घोटाळ्यातील सर्व संबंधित अधिकारी, आर्किटेक्ट, कर विभाग यांच्या बद्दल ट्रस्ट तर्फे सोमपा आयुक्त यांच्याकडे तक्रार करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
जुने मिल ट्रस्टचे डॉ.संदीप आडके, औदुंबर आकुडे, दीपक पेंढारकर, चंद्रकांत नकाते, कल्याण नकाते, केशव जागीरदार, वासुदेव पंडित, डॉ. डायना आडके उपस्थित होते.