महुद प्रतिनिधी
महुद येथे माजी मंत्री व शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते स्व गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त जाहीर आबासाहेबांच्या कार्यावरती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते...सदर प्रमुख वक्ते म्हणून माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्ह्याचे युवा नेते मा.धैर्यशिल मोहिते -पाटील उपस्थित होते तर पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला...
सर्वप्रथम प्रमुख मांन्यवरांचे स्वागत हालग्यांच्या व फटाक्यांच्या आतषबाजीत वाजत गाजत करण्यात आले.सदर मिरवणुकीमध्ये आबासाहेबांच्या नावाचा जयघोष तरुण कार्यकर्ते करीत असल्याचे पहावयास मिळाले... भव्य अशा स्वागताने सभेस सुरवात झाली.. महुद जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले...व पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी आपले विचार व्यक्त करण्याच्या अगोदर प्रथमता स्व हरी नरके सर यांच्या दुःखद निधन झालेबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन आपल्या भाषणाला सुरुवात केली पुढे बोलताना देशमुख साहेब म्हणाले की.. सध्या राजकारणाची अवस्था पहाता आबासाहेबांच्या राजकीय कारकीर्दीचा हेवा वाटत आहे..व आबासाहेबांनी राजकारण हे नाही रे वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी केला.
आज जे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते सन्मानाने समाजामध्ये वावरतात ती आबासाहेबांची देणं आहे.आबासाहेबा़नी आयुष्यभर कुठलाही स्वार्थ न बाळगता आपली राजकीय वाटचाल केली ती संपूर्ण राज्याला आदर्श वृत आहे.. येणाऱ्या काळात आपण सर्वांनी आबासाहेबांच्या विचारांवरती वाटचाल करण्याचा संकल्प डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी बोलताना व्यक्त केले....
सोलापूर जिल्ह्याचे युवा नेते धैर्यशील मोहिते पाटील बोलताना म्हणाले की.. स्व आबासाहेबांचा मला काही काळ सहवास लाभला त्यांचे कामाची पध्दती मला जवळुन पाहण्याचा योग आला.नियोजन समितीच्या बैठकीत स्व आबासाहेब जे ग्रामीण भागातील प्रश्न उपस्थित करताना मी पाहीले आहे ते एखाद्या प्रश्नावर बोलले तर सर्व सभागृहात सर्व नेते शांततेने ऐंकत आसत व तो प्रश्न तात्काळ अधिकारी वर्गाला सोडवणे भाग पडत आसे.
सोलापूर जिल्ह्याचे नेते म्हणजे मोठे दादा यांचे व परिचारक मोठे मालक व आबासाहेब यांचे घनिष्ठ संबंध संपुर्ण राज्याला माहित आहेत... सोलापूर जिल्ह्याचा कोणताही महत्वाचा प्रश्न असो किंवा जिल्हा दुध संघ असो की जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुक असो हे तिघे एकत्र बसले की..निवडणुक बिनविरोध होत आसे...तो काळ व आताचा काळ फार फरक आहे.येणाऱ्या काळात ज्या प्रमाणे मोठे दादा व आबासाहेब यांचे सलोख्याचे व विश्वासाचे संमंध होते तसेच संमंध व विश्वास मोहिते पाटलांची आंम्ही नवीन पिढी व बाबासाहेब हे कायम राखण्याचा विश्वास धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला..कारण मोठ्या दादांनी तसा आंम्हा सर्वांना हा सल्ला दिला असल्याचे सांगितले.
शेवटी बोलताना माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी स्व आबासाहेबांच्या कार्याविषयी बोलताना सांगितले की... आबासाहेबांनी कायम पक्षाच्या निष्ठेचे राजकारण केले..पक्ष निष्ठा जपली..पक्ष निष्ठा संभाळत राजकारणातुन. समाजकारण केले... स्व यशवंतरावजी चव्हाण साहेब हे जेंव्हा दिल्लीच्या राजकारणामध्ये गेले तेंव्हा स्व वसंतदादा पाटील यांनी देवु केलेले संन्मानाचे पद आबासाहेबांनी नाकारले व आपण गरीब कष्टकरी दलीत यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमदार झालो आहोत पद - प्रतिष्ठा मिळवण्यासाठी नाही .आपणास लाल दिव्याच्या गाडीचे अजिबात आकर्षण नाही..मी जनसेवक आहे असे नम्रपणे सांगणारे एकमेव उदाहरण म्हणजेच आबासाहेब.
ढोबळे बोलताना पुढे म्हणाले की..पंढरपुरच्या पांडुरंगाने नाकारले..दुसऱ्यांदाही लोकसभेला झिडकारले...मग मी मंगळवेढयाच्या दामाजीच्या आश्रयाला गेलो.व निवडणुकीला सुरवात झाली प्रचाराच्या शेवटच्या काही दिवसांत मी आबासाहेबांना प्रचाराला येण्याची विनवणी केली.व आबासाहेबांनी प्रचाराला येण्याचे कबुल केले व मंगळवेढा मतदार संघातील हुंन्नुर या गावी सभा ठरली ..आबासाहेब सभेसाठी आले येताना साधा गणवेष जसा आज बाबासाहेबांनी परिधान केला आहे तसा...कुठलाही लवाजमा नाही ते आले आणि सभेला संबोधित करताना म्हणाले की या तरुण पोराला निवडुन द्या.मि तुंम्हाला विश्वास देतो मी माझा सातबारा घेऊन यांचा जामीन म्हणून आलो आहे.. एवढया शब्दाखातीर लोकांनी मला पाठींबा दिला व मी निवडुन आलो या गोष्टी आयुष्यात विसरता येण्यासारख्या नाहीत आमच्या वरती फार मोठे उपकार आहेत आबासाहेबांचे...
मी जय ज्या पक्षात काम केले येथे अनेक अडचणी आल्या अगदी टोकाचा विरोध झाला परंतु जरी आबासाहेबांचा पक्ष वेगळा असला तरी त्याच्या शब्दाला फार मोठी किंमत होती ते मला म्हणायचे काळजी करु नका.. सगळं व्यवस्थित होईल आणि सगळं व्यवस्थित व्हायचेही..आसे आबासाहेब होते.आकरा वेळा आमदार असुनही साधी राहणी उच्च विचारसरणी आबासाहेबांनी कायम जपली... कुठलाही स्वार्थ मनामध्ये आणला नाही..की अपेक्षा ठेवली नाही.. सध्या आपण राजकारणात बघतोयकी एखादा नगरसेवक जरी झाला तर तो कसा वागतो त्याचा डामडौल काय..थाट कसा असतो अक्षरशः तो फुगुन फुगुन फुटायला होतो...पण आबासाहेब कायम आहे तसेच राहीले..एकदम सामांन्य नागरिकाप्रमाणे त्यांचे रहाणीमान होते.आजही तुंम्हाला बाबासाहेबासारखा विश्वासु नेता लाभला आहे
तो ही साधी राहणी उच्च विचारसरणी जोपासणारा .. आबासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारा नेता लाभला आहे...आपण सर्वांनी ठामपणे बाबासाहेबांच्या मागे आपली ताकत लावुन विश्वास दाखवला तर ती आबासाहेबांना खरी श्रध्दांजली आसेल असे मत प्रा ढोबळे यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास तालुका चिटणीस दादाशेठ बाबर, पुरोगामी युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक गोडसे,माजी जि.प.सदस्य सुबराव बंडगर सर, रमेश जाधव,अँड नितीन गव्हाणे, उल्हास धायगुडे,पिंटु बंडखोर,वैभव केदार,मनोज ढोबळे, दत्ता टापरे यांच्या सहित महुद गावचे सरपंच उपसरपंच सदस्य विविध संस्थांचे चेअरमन सदस्य व विविध पदाधिकारी व नेते तसेच महुद जिल्हा परिषद गटातील सर्व नेते व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित आसल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली