पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
15 ऑगस्ट निमित्त नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा ध्वज मिळावा म्हणून पंढरपूर येथील मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये राष्ट्र ध्वज मिळायची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिसमधून आपण राष्ट्रध्वज खरेदी करू शकता अथवा आपल्या भागातील पोस्टमनच्या मार्फत उपलब्ध करून घेऊ शकता किंवा www.epostoffice.gov.in या संकेतस्थळावर आपली मागणी नोंदवल्यास पोस्टमन घरपोच आणून देतील.
तरी सर्वानी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रकांत भोर अधिक्षक, डाकघर पंढरपूर विभाग पंढरपूर यांनी केले आहे