पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर शहर पोलीस ठाणेकडून आर्थिक अफरातफर करणा-या पथसंस्थेचे चेअरमन, संचालक, मॅनेजर यांचेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरपूर शहर पोलीस ठाणेस मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिपत्याखालील विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२, सहकारी संस्था (पणन), सोलापूर यांनी दिलेल्या तक्रारी वरून चौकशी कारवाई अंती १) संकल्प नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पंढरपूर २) संस्थेचे मुख्य प्रवर्तक चेअरमन प्रथमेश सुरेश कट्टे रा. पंढरपूर ता. पंढरपूर जि. सोलापूर व ३) संस्थेचे संचालक / सेक्रेटरी/मॅनेजर अविनाश दत्तात्रय ठोंबरे रा. करकंब ता पंढरपूर यांनी संगनमताने कागदपत्रांचे बनावटीकरण करून जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर या शासकीय कार्यालयाचा व ठेवीदारांचा विश्वासघात व फसवणूक करून एकुण रक्कम रु.३९३७७०००/- (अक्षरी रुपये तीन कोटी त्र्याणव्य लाख सत्याहत्तर हजार फक्त) चा अपहार केला असल्याचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८१ (३) (ब) अन्वये या कार्यालयाने केलेल्या वैधानिक तपासणीमध्ये निर्दशनास आले असल्याने त्यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान १८६०, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ व अनियंत्रित ठेव योजना बंदी कायदा २०१९ मधील तरतुदीनुसार आज दि. ११/०८/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून नमुद आरोपीतांना गुन्हयामध्ये अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे , अपर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव , अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण फुगे, सपोनि. कपिल सोनकांबळे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत, पोहवा शरद कदम, पोहवा सुरज हेंबाडे, पोहवा बिपीनचंद्र ढेरे, पोना दादा माने, पोना सचिन हॅबोडे, पोहवा धंनजय जाधव, पोहवा गोविंद कामतकर या पंढरपूर शहर पोलीस ठाणे स्टाफ यांनी केलेली आहे.