पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राचे प्रणेते डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिन आणि ग्रंथपाल दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.
ग्रंथालयामध्ये सुसूत्रता आणण्याचं कार्य करणारे ग्रंथालय शास्त्राचे प्रणेते डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा स्मृतिदिन हा "ग्रंथपाल दिन" म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो.
या कार्यक्रमात उमा महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. चौरे अंजली यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पांढरे विद्युलता यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी ना दो महानोर यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या स्मृतीदिना निमित्ताने साहित्य कट्ट्याचे आयोजन, ना.धो महानोर यांच्या कवितांचे गायन,ग्रंथालयातील संदर्भ साहित्याचे QR code , सजेशन बॉक्स याचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेणुका बडवे, सूत्रसंचालन प्रा.सविता दुधभाते, आभार ग्रंथपाल दत्ता घाडगे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ.बंडगर विलास, बागवान जाकिर, खिस्ते रोहित, वैद्य मुक्ता, शिक्षकेतर कर्मचारी श्री वाघमारे विजय, लोखंडे त्रिगुण, अख्तर पटवेकरी, सागर येडगे, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.