सोलापूर प्रतिनिधी
दयानंद कला व शास्त्र कनिष्ठ महाविद्यालयातील सचिन वडते, आकाश करमल व किरण गायकवाड या ३ विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांना ३८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.चे कर्नल राजेश गजराज, कर्नल विक्रम जाधव, एस. एम. अरूण ठाकूर व कॅप्टन भीमाशंकर व्हनमाने यांचे मार्गदर्शन लाभले.या विद्यार्थ्यांनी सलग तीन वर्षे मेहनत घेतल्याने संस्थेचे स्थानिक सचिव महेश चोप्रा, प्राचार्य डॉ. विजयकुमार उबाळे, उपप्राचार्य अरुण खांडेकर,प्रा. विजयकुमार बिराजदार,प्रा.माधव कुलकर्णी, प्रा.सतीश घुले,प्रा.गीताभारती जिंदे,प्रा.प्रिंयका मस्के,प्रा.राज पवार यांच्यासह प्राध्यापक वृंदानी अभिनंदन करुन देशसेवेसाठी शुभेच्छा दिले. यावेळी तीन्ही विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
यावेळी प्रा. विजयकुमार बिराजदार यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या धाडसी निर्णयाचे कौतुक केले.उपप्राचार्य अरुण खांडेकर यांनी दयानंद महाविद्यालयाच्या विकासात विद्यार्थ्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.कष्ट ,परिश्रम व मेहनत घेतल्याने विद्यार्थ्यांचे कौतुक केले.प्राचार्य डॉ.विजयकुमार उबाळे यांनी या तिन्ही अग्नीवीरांना देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आवाहन केले.अग्नीवीर वडते यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या सेवेत देशाचे, महाविद्यालयाचे व आईवडीलांचे नाव लौकिक होण्यासारखे कार्य करणार असल्याचे सांगितले सूत्रसंचालन प्रा.गीताभारती जिंदे व प्रा. प्रियांका मस्के यांनी केले तर प्रा.सतीश घुले यांनी आभार मानले.