सोलापूर प्रतिनिधी - ॲड शिवाजी कांबळे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत सहाय्यक सरकारी अभियोक्ता ( वर्ग -अ) पदी सोलापूर येथील ॲड. चंद्रकांत नाईकवाडे यांची नुकतीच निवड झाली आहे.
सन 2022 च्या जाहिराती नुसार सरळ सेवा भरती पद्धतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता (वर्ग -अ ) या पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या लेखी व मौखिक परीक्षेत ते यशस्वी झाल्याने ॲड. चंद्रकांत नाईकवाडे यांची निवड झाली आहे. सध्या ते बार्शी येथील न्यायालयात विशेष सहा. सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत .
त्यांचे शालेय शिक्षण हे दक्षिण सोलापूर येथील मंद्रूप या गावी झाले असून BSL LLB ही विधी पदवी दयानंद विधी महाविद्यालय सोलापूर , तर LLM ही पदवी मुंबई विद्यापीठातून मिळवली आहे.
यानंतर त्यांनी दयानंद विधी महाविद्यालय येथे पाच वर्ष प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाची उत्कृष्ट सेवा केलेली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत यशस्वी होण्याकरिता विधी क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा व परिश्रमाचा त्यांना फायदा झाला आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खाजगी वकील म्हणून दिवाणी व फौजदारी क्षेत्रातही काम केले आहे. सोलापूर बार असोसिएशनचे ते विद्यमान सदस्यही आहेत. तसेच विधि क्षेत्रात गेली सोळा वर्षापासून कार्यरत आहे . अमोघसिद्ध नाईकवाडे यांचे ते सुपुत्र आहेत त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.