सोलापूर प्रतिनिधी
नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्लिश मिडीयम स्कूलला स्मृती ऑरगॅनिक लिमिटेड तर्फे १० संगणक भेट देण्यात आले. स्मृती ऑरगॅनिक लिमिटेडचे उपाध्यक्ष रफिक शेख यांच्या हस्ते संगणक कक्षाचे उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार होते.यावेळी व्यासपीठावर स्मृती ऑरगॅनिक लिमिटेडचे पदाधिकारी कमलाकर गज्जम, कार्तिक गुंडेली, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले, मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार आदी उपस्थित होते.
यावेळी रफिक शेख म्हणाले स्मृती ऑरगॅनिक लिमिटेड कंपनीचे समाज संगणक साक्षर करण्याचे स्वप्न असून गरीब मुलांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान मिळण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार म्हणाले,स्मृती ऑरगॅनिक लिमिटेड कंपनीचे संगणक साक्षरता हे उपक्रम स्तुत्य असून शाळेतील विद्यार्थ्यांनी व पालकांनी पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरता अश्विनी गंगुल, केदार कुंभार, जगदेव गवसने यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत बत्तुल यांनी केले तर अश्विनी गंगुल यांनी आभार मानले.