या घटनेची सखाेल चाैकशी मंदिर समितीद्वारे सुरु
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन मिळावे यासाठी भाविकांकडून पैसे घेण्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. याबाबत दाेघांची कसून चाैकशी सुरु आहे. चाैकशीअंती दाेषी आढळल्यास दाेघांवर गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती मंदिर समिती कडून सांगण्यात आली.
अधिक मास निमित्ताने पंढरपूरात भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. नुकत्याच झालेल्या कमला एकादशी निमित्त जवळपास अडीच लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले हाेते.
दरम्यान श्री विठ्ठल दर्शनास भाविकांकडून पैसे घेऊन सोडण्याचे रॅकेट आज समोर आले आहे. हैद्राबाद मधील तीन भाविक दर्शनास आल्यानंतर त्यांना गाठून दाेन जणांनी (एजंट) प्रत्येकी दोन हजार रुपयांची मागणी करून विठ्ठल दर्शनास सोडण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान मंदिर समिती मधील या पेड दर्शन साखळीत कोण काेण सहभागी आहेत यांचा शोध घेणे गरजेचे आहे.अशी वारकरी भाविकांची मागणी होत आहे.