सोलापूर प्रतिनिधी
सनातन हिंदू वीरशैव आध्यात्मिक संस्कार केंद्र व श्री. वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ सोलापूर कडून दक्षिण सोलापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र धोत्री येथील,श्री बृहन्मठ होटगी शैक्षणिक संस्था संचालित, श्री.भगवती गौरीमाता प्रशाला, कनिष्ठ महाविद्यालयातील इतिहास व राज्यशास्त्र विषयाचे ज्येष्ठ प्राध्यापक श्री.स्वामीनाथ कलशेट्टी सरांना आदर्श शिक्षक पुरस्काराने श्री.श्री.श्री 1008 ज्ञान सिंहासनाधीश्वर डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, काशी महापीठ यांच्या अमृत हस्ते सन्मानित करण्यात आले. श्री.श्री.श्री.1008 जगद्गुरुंनी आपल्या आशीर्वाचनातून प्रा. कलशेट्टी सरांच्या विविध कार्याचा गुणगौरव करून शुभाशीर्वाद दिले. कलशेट्टी सर हे आमच्या संस्थेतील अभ्यासू व्यक्तिमत्व, व्याख्याते, निरुपणकार, पर्यावरण प्रेमी,पालक विद्यार्थीप्रिय, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे असल्यामुळेच व सरांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना आजपर्यंत एकूण 98 पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे असेही म्हणाले.कलशेट्टी सरांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये नामवंत पदावर कार्यरत आहेत असे गौरवोद्गार काढले.
यावेळी श्री.ष.ब्र.श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी, श्री.ष.ब्र.नीलकंठ शिवाचार्य स्वामीजी म.नि.प्र स्वामीनाथ स्वामीजी,श्री.ष.ब्र. सदाशिव शिवाचार्य स्वामीजी,आदीनीं आशीर्वाद दिले. याप्रसंगी माजी महापौर शोभाताई बनशेट्टी,श्रीशैल बनशेट्टी,सिद्धाराम साबळे,व्याख्यान केसरी वेदमूर्ती. बसवराज शास्त्री, डॉ.वेदमूर्ती शिवयोगी शास्त्री होळीमठ,वेदमूर्ती सिद्धय्या हिरेमठ वेदमूर्ती ईश्वर शास्त्री होळीमठ,वेदमूर्ती कलय्या शास्त्री स्वामी वेदमूर्ती परमेश्वर शास्त्री हिरेमठ,बसवराज स्वामी,हणमंत पाटील (गौडा)आदिनीं कौतुक केले.
सदर कार्यक्रमासाठी वैदिक मंडळाचे सर्व पदाधिकारी,असंख्य रुद्रकन्या,मान्यवर भक्तगण माता-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.आदिनीं मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन कौतुक करून अशीच यशस्वी वाटचाल यापुढील काळात होत राहो अशी सदिच्छा व्यक्त केले.