रोटरी क्लब जागतिक पातळीवरील सामाजिक कामात अग्रेसर असणारी संस्था
पुणे प्रतिनिधी
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ यांच्या वतीने गेली बरीच वर्षे विविध सामाजिक पर्यावरण शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवून सामाजिक हित जपत असताना २०२३-२४ वर्षातील पहिल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे, "अभंगवाणी" चे आयोजन १९ ऑगस्ट रोजी पी . वाय . सी . हिंदू जिमखाना हॉल येथे आयोजित करण्यात आले होते.
सुरवातीला जिल्हा ३१३१ डिस्ट्रिक्ट गवर्नर मंजु फडके,डिजीइ शितल शहा, सांस्कृतिक डायरेक्टर अमृता देवगावकर, रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्स चे अध्यक्ष डॉ समीर डोलारे,सौ मधुर डोलारे (रोटरी चे निवेदन) , सौ स्नेहल भट्ट, श्री अभय जबडे , व जेष्ठ तबलावादक पं.पांडूरंग मुखडे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून पं.अमोल निसळ यांच्या गायनाला सुरुवात झाली.
वारकऱ्यांच माहेर असलेल्या माझे माहेर पंढरी या अभंगांने सुरुवात करुन आता कोठे धावे मना, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल,चुनरीया झिनी रे झिनी,केवट, पंढरीचा वास चंद्र मागे स्नान,अबीर गुलाल उधळीत रंग,तसेच करणं देवगावकर यांनी गायलेल्या माझा भाव तुझे चरणी आणि ज्ञानियांचा राजा या अभंग टाळ्या देऊन गेला,अशा अनेक गाजलेल्या संतरचनांनी वातावरण भक्तिमय झाले होते, तबला, पखवाज, व्हायोलिन यांच्या साथीने अधिक रंगत वाढली होती,निवेदन मधुरा ओक यांनी सुंदर केले.त्यांना तितकीच अप्रतिम साथसंगत तबला निखिल पाठक, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे व्हायोलिन प्रभंजन पाठक हार्मोनियम सुरंजन जायभाय, सिंथेसाईजर रोहित कुलकर्णी,टाळ नागेश भोसले स्वरसाज करणं देवगावकर यांनी केली. सौ अमृता देवगावकर यांनी रोटरी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देऊन भविष्यकाळात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी आर्थिक मदत ओरलीकॉन बालझर च्या अध्यक्ष श्री प्रवीण शिरसे, आणि सहकारी श्री नचिकेत कणसे व श्री चेमिकल्स च्या सौ गार्गी कुलकर्णी यांनी केली. तसेच रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या २१ साळूबास नि मिळून देखील आर्थिक सहकार्य केले.
या अभंगवाणी कार्यक्रमाला रोटरीयन आणि रसिकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.