मारापूर प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे मारापूर (ता. मंगळवेढा) येथे जयमल्हार कला व क्रीडा मंडळ यांचे वतीने भव्य आट्यापट्याचे सामने भरविण्यात आले होते. या सामन्याचे उद्घाटन येताळा भगत यांचे उपस्थितीमध्ये व मारापुरचे लोकनियुक्त सरपंच विनायक माधवराव यादव अध्यक्षतेखाली,माजी सभापती संभाजी गावकरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच अशोक आसबे , विक्रम यादव , अमोल जानकर , अभिमान जानकर , आनंदराव पाटील , नाथा माने, भुजंगराव आसबे, उमेश आसबे, अशोक यादव, संतोष गांडुळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामीण भागातील रांगड्या खेळा साठी सोलापूर जिल्ह्या मधील तीस संघांनी सहभाग घेतला. ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठी असे मैदानी खेळ मारापूर मधील जयमल्हार कला व क्रीडा मंडळ प्रत्येक वर्षी भरवत असतात. या सामन्यासाठी प्रथम क्रमांकासाठी २१०००/ द्वितीय क्रमांकासाठी १५०००/ तृतीय क्रमांकासाठी ११०००/ चतुर्थ क्रमांकासाठी ७०००/.पाचवे क्रमांकासाठी,५०००/ अशी पारितोषिके ठेवण्यात आली होती.
या सामन्यामध्ये प्रथम क्रमांक शिरढोण ता.पंढरपूर, द्वितीय क्रमांक १४/१५सेक्शन ता. माळशिरस, तृतीय क्रमांक घरनिकी ता मंगळवेढा, चतुर्थ क्रमांक शिरभवी ता.सांगोला,पाचवा क्रमांक अकोला ता. मंगळवेढा . असे पटकविण्यात आले. तालुका शो मॅच मंगळवेढा - पंढरपूर व सांगोला - माळशिरस या संघामध्ये घेण्यात आली यामध्ये सांगोला - माळशिरस संघाने विजय मिळवला.
या सामन्यासाठी मार्केट कमिटीचे मा.सभापती सोमनाथ आवताडे, मा जी सभापती प्रदिप खांडेकर, अभिजीत पाटील,तावशीचे सरपंच पप्पू यादव ,अनिल वगरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष भगवान आसबे, बाळासाहेब यादव,बंडोपंत पाटील यांची उपस्थिती होती. सामने यशस्वी करण्याठी राजकुमार आसबे, सिद्धेश्वर माने, अनिल माने, हरिभाऊ यादव गवळी, बापू आसबे, ओंकार आसबे, बालाजी यादव,योगेश आसबे, तात्या सातपुते, संभाजी यादव व सर्व जयमल्हार कला व क्रीडा मंडळाचे पदाधिकारी यांनी घेतले.