भाळवणी प्रतिनिधी
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स भाळवणी मध्ये आज मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य एन एम गायकवाड , उपप्राचार्य पिसे , पर्यवेक्षक रोकडे यांच्या यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सोबतच विद्यालयातील क्रीडा शिक्षकांचा सन्मान करताना कॅप व सिटी देऊन करण्यात आला. यात विद्यालयाचे क्रीडाशिक्षक व विभाग प्रमुख जमदाडे गजानन , जाधव के.के. , दडस सर, ऐवळे सर, नारनवर सर, नागटिळक मॅडम, भोसले मॅडम, नागणे मॅडम यांचा सन्मान करण्यात आला.
सोबतच विद्यालयातील संतोष राजगुडे व हर्षदा चोरमले या विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केलेविद्यालयातील क्रीडा शिक्षिका श्रीमती भोसले मॅडम यांनी आपले मत मांडले. यात विद्यार्थ्यांनी शारीरिक विकासासाठी योगासनांचा व व्यायामाचा अंगीकार करून शरीर सुदृढ ठेवावे असे महत्व सांगितले.
विद्यालयाचे प्राचार्य गायकवाड यांनी आपले मत मांडताना विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाचे महत्त्व विविध उदाहरणातून पटवून सांगितले.प्रास्ताविक विद्यालयातील शिक्षिका नागटिळक मॅडम यांनी तर सूत्रसंचालन विद्यालयातील इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कु. सृष्टी गोफणे व साक्षी खाडे या विद्यार्थिनींनी केले. कु प्रतीक्षा गोफणे या विद्यार्थिनीने आभार मानले.
यावेळी विविध खेळांचे आयोजन ही विद्यालयात करण्यात आले. यात खो- खो, कबड्डी, गोळा फेक, भालाफेक, रस्सीखेच ,लांब उडी यासारख्या खेळांचा सराव करण्यात आला.
विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी क्रीडाशिक्षक जमदाडे गजानन यांचा विशेष सन्मान करण्यात आला . याप्रसंगी विद्यालयातील माजी खेळाडू व पत्रकार नितीन शिंदे उपस्थित होते. अशा रीतीने विद्यालयात विविध खेळांच्या माध्यमातून मेजर ध्यानचंद यांच्या आठवणींना उजाळा देऊन क्रीडा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.