पंढरपूर प्रतिनिधी
विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे तहसील कार्यालय पंढरपूर च्या महसूल विभागातर्फे महसूल सप्ताह निमित्त युवा संवाद अंतर्गत युवक मतदार नोंदणी शिबिरचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी नायब तहसीलदार वैभव बुचके यांनी सांगितले की भारताच्या उज्वल भविष्यासाठी सर्व युवकांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन देशाच्या विकासात हातभार लावावा. या कार्यक्रमासाठी प्राचार्य मुंढे यु.आर, प्रशालेतील शिक्षक व बीएलओ सुनील विश्वासे,किमान कौशल विभाग प्रमुख संजय पवार, विवेक चौगुले,तुकाराम मस्के व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर भोसले यांनी केले तर आभार सुनील चव्हाण यांनी मांडले.