भाळवणी प्रतिनिधी
वसंतराव काळे विद्यामंदिर चंद्रभागा नगर भाळवणी या प्रशालेमध्ये 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने भाळवणी परिसरातील सर्व प्रमुख मान्यवर तसेच सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ कार्यकारी संचालक व इतर पदाधिकारी पालक विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी कवायत संचलन अतिशय छान केले. सदर कार्यक्रमासाठी स्वातंत्र्यदिनानिमित्त छोटे गटापासून ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाषणे केली छोटा गट व मोठा गट यांनी बडबड गीते म्हटली तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गाण्यावर छान नृत्य केले तसेच पी टी एस व मंथन परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नंबर आलेत त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे आज वाढदिवस होते त्यांना गुलाब पुष्प देऊन कल्याणरावजी काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चेअरमन कल्याणराव काळे यांनी भूषवले तर ध्वजारोहण कारखान्याचे व्हाईस चेअरमन भारत नाना कोळेकर यांनी केले याप्रसंगी नागेश दादा फाटे संस्थेचे सचिव हनुमंत जमदाडे व संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी सहकार शिरोमणी कारखान्याचे संचालक मोहन बापू नागटिळक, राजकुमार पाटील ,राजाभाऊ माने, परमेश्वर लामकाने ,गोरख जाधव ,अरुण नलवडे, आनंद माने, सुनील पाटील, जयसिंह देशमुख, कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे, राजेंद्र ताड, दाऊद भाई शेख, प्रताप काका म्हेत्रे, निहार शेख तसेच गावातील सर्व मान्यवर कारखान्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांची निवड आबासो जाधव यांनी केले तर अनुमोदन काळे यांनी दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास चौगुले यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षिका विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.यावेळी परिसरातील पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.