पंढरपूर प्रतिनिधी
विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेचे सचिव ॲड. वैभव टोमके, संस्थेचे संचालक अनिरुद्ध सालविठ्ठल तसेच ज्यांनी कारगिल युद्धामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असे मा.सैनिक अशोक नकाते या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.ध्वजारोहण प्राचार्य मुंढे यु. आर. यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा. सैनिक अशोक नकाते यांनी देशाच्या सीमेचे रक्षण करताना तसेच कारगिल युद्धामध्ये आपल्या सैन्याला किती कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला याची माहिती त्यांनी सर्वांना दिली. युद्धामधील अंगावर शहारे आणणारे प्रसंग त्यांनी सांगितले. यानंतर संस्थेचे सचिव टोमके यांनी आपल्या मनोगतात सांगितले की तुमच्यासारख्या महान सैनिकांमुळे आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत आम्हाला तुमचा सर्वांचा अभिमान आहे.
आम्ही यामधून एकच बोध घेऊ शकतो की प्रशालेच्या विद्यार्थ्यांची प्रामाणिकपणे सेवा करणे हीच आमच्यासाठी ईश्वर सेवा आहे आणि यासाठी आम्ही सर्वजण वचनबद्ध आहोत.यावेळी पर्यवेक्षक सुनील पाटील, विभाग प्रमुख संजय पवार, ज्येष्ठ शिक्षक अशोक पवार, क्रीडा शिक्षक महादेव रणदिवे, सोमनाथ फडतरे, राजुभाई मुलाणी,शिवाजी येडवे,सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन मधुकर भोसले यांनी केले.