सोलापूर प्रतिनिधी
लायन्स इंन्टर नॅशनल अंतर्गत लायन्स क्लब सोलापूर व्टिन सिटी आणि स्टिपिंग स्टोन प्री प्रायमरी स्कू ल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यामध्ये सर्वप्रथम ध्वजवंदन करून मानवंदना देण्यात आली.
त्यानंतर शाळेतील विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी यश संपादित केल्याबद्दल विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. या कार्यक्रमांमध्ये लायन्स क्लब सोलापूर व्टिन सिटीच्या च्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाण्याची सोय व्हावी म्हणून क्लबच्या वतीने पाण्याची टाकी भेट देण्याचे जाहीर केले.त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.
यावेळी लायन्स क्लबचे लायन नागेश बुगडे,राजू देसाई, लायन सोमशेखर भोगडे , लायन ज्ञानेश्वर कुलकर्णी, लायन सागर पुकाळे, लायन राजेश परसगौड यांच्यासह शाळेचे अध्यक्ष महादेव ठोंबरे, मुख्याध्यापिका सविता ठोंबरे, संचालक मिलिंद ठोंबरे,यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.