सोलापूर प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो सोलापूर कार्यालयाच्या प्रांगणात ७७ वा भारतीय स्वातंत्र्यदिनाचा शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
यावेळी सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव, निवृत्त अधिकारी सतीश घोडके, उद्योगपती सुहास रावडे, उद्योजक विरेश नसले, कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, योगीराज कोंडाबत्तीन, सुरज जाधव आणि साईराज राउळ आदी मान्यवर उपस्थित होते.