पुणे प्रतिनिधी
पुणे येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उद्घाटन सारसबाग शिवसेना भवन येथे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे विश्वासू व मुख्यमंत्री कार्यालयाचे OSD मंगेशजी चिवटे मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य कक्ष प्रमुख राम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वरील वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यालयाचे अतिशय उत्साहामध्ये उद्घाटन झाले.
त्याप्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा उप समन्वयक सतीश महादेव गावडे बारामती तालुका समन्वयक मंगेश जी खताळ व बारामती मीडिया पत्रकार तालुका समन्वयक श्रीकृष्ण मूर्ती जगताप बारामती मेडिकल सेलचे संतोष गोलांडे बारामती वैद्यकीय टीम सर्व पदाधिकारी उपस्थित होते.