पंढरपूर प्रतिनिधी
आपल्या प्रशासकीय कर्तव्यसेवेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गतिमान करणारे जिल्हाधिकारी डॉ. मिलिंद शंभरकर यांची राज्य आपत्ती व्यवस्थापन मंडळ कार्यकारी संचालक म्हणून बदली झाल्याबद्दल पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा आवताडे यांच्या हस्ते त्यांचा शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे श्री.विठ्ठल-श्री.संत दामाजी पंत यांची संयुक्त सुबक मूर्ती देऊन सन्मान करत त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
शांत,संयम आणि विवेकशील स्वभाव साधनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील विविध शासकीय व निम-शासकीय विकास कार्यांना नियमांच्या चौकटीत राहून मार्गी लावणारे व जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी आपले अनमोल योगदान देणारे प्रशासन प्रमुख म्हणून डॉ. शंभरकर यांची जिल्ह्यातील नागरिकांशी नाळ जोडली होती. एक उमदा आणि कामसू प्रशासकीय अधिकारी अशी कार्यख्याती असणाऱ्या डॉ. शंभरकर यांच्या पुढील प्रशासकीय सेवेसाठी आमदार समाधान आवताडे यांनी मतदारसंघाच्या वतीने शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी पंढरपूर पं.स.माजी उपसभापती विजयसिंह दादा देशमुख, प्रांताधिकारी गजानन गुरव , उद्योजक विनोदराज लटके मेंबर, पत्रकर अभिराज उबाळे,पत्रकार सुरज सरवदे, तुकाराम आबा कुरे,लक्ष्मण जाधव, अमीन भाई शेख, अतीक मुलाणी,संभाजी कूरे , भाजपा जिल्हा सचिव नितीन करंडे, आबासाहेब पाटील,युवा नेते प्रथमेश बागल आदी मान्यवर, इतर प्रशासकीय अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते.