सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर शहर-जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, डॉ. मेतन फाउंडेशन व दयानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात क्रीडा दिन उत्साहात पार पडला. यानिमित्ताने आर्थोपेडिक सर्जन डॉ. व्यंकटेश मेतन यांचे 'खेळातील दुखापती व त्यांचे व्यवस्थापन' या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी व्यासपीठावर दयानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरुण खांडेकर, शहर -जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दशरथ गुरव, शहराध्यक्ष विठ्ठल कुंभार, सचिव शेंडे, मुख्याध्यापक विरेश थळंगे, सचिन गाडेकर ,प्रमोद चुंगे, पाटील, वीरेश अंगडी, सचिन ढवण, संदेश पवार, शेख ,सारंग पाटील, श्रीधर गायकवाड, प्रबुद्ध चिंचोळकर, व्हणसे, शिवानंद सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. मेतन यांनी खेळाडूंना मैदानावर होणाऱ्या दुखापती ,व्यवस्थापन व प्रथमोपचार याविषयी स्लाईड शोद्वारे इलाज कसे करावे याची माहिती शिक्षकांना दिले. शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य महत्त्वाचे असल्याने ध्यानधारणा करावी असे ते म्हणाले. उपप्राचार्य अरुण खांडेकर म्हणाले, आदर्श खेळाडू निर्माण होण्यासाठी शिक्षकांनी खेळाडूंची शारीरिक व मानसिक आरोग्य समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुहास छचुंरे, अजित पाटील ,राहुल हजारे,डॉ. शैलेश बंडे आदींनी परिश्रम घेतले.