दापोली प्रतिनिधी
केळशी येथील जि.प. केंद्रशाळेतील इयत्ता पाचवी वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.
या शाळेतील कु. हर्षल अमरसिंग पवार यांने 226 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत 75 व क्रमांक तर तालुका गुणवत्ता यादीत ८ वा क्रमांक प्राप्त केला आहे.
तसेच कु. वैष्णवी स्वप्निल साखरकर हिने 220 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत ९८ वा क्रमांक तर तालुक्याच्या गुणवत्ता यादीत ११ वा क्रमांक पटकावला आहे.
तसेच कु. वैष्णवी साखरकर हिची नवोदय विद्यालयासाठी देखील निवड झालेली आहे.
गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना कोणताही खाजगी क्लास अथवा शिकवणी लावलेली नव्हती. शाळेत त्यांच्या वर्ग शिक्षिका माळवदे मॅडम सकाळी नऊ आणि संध्याकाळी सात पर्यंत घरी जादा तास घेत होत्या. त्याचाच फायदा व त्यांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश मिळाले त्याबद्दल विद्यार्थ्यां बरोबरच माळवदे मॅडमचेही केळशी परिसरातूनच व सर्व दापोली तालुक्यातून कौतुक होत आहे

