करकंब येथे सिध्दनाथ मंदिर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
करकंब प्रतिनिधी
करकंब येथे प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असलेल्या श्री सिध्दनाथ मंदिर करकंब येथे श्री संत सावता महाराज,श्री संत नामदेव महाराज आणि सद्गुरू बजरंग तात्या महाराज पिसे यांच्या समाधी सोहळ्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहात चवथ्या दिवशीच्या कीर्तन पुष्पात आदरणीय डॉ जयवंत महाराज बोधले सांगत होते.
सुरुवातीला संत तुकाराम महाराजांच्या सत्य साच खरे विठ्ठलाचे नाम बरे या सुंदर अशा नामपर अभंगावर निरुपण करताना सांगितले की बजरंग तात्यांच्या आशिर्वादाने गेली ३६ वर्ष अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून साधी राहणी उच्च विचारसरणी,कमी बोलण पण महत्त्वाचे बोलणं, मितभाषी तात्यांनी कधी कुणाला दुखवले नाहीसतत नामस्मरणाचा विचार सर्वांना दिला आणि शरीर रुपानी नसले तरी ते आत्मरुपानी या मंदिर परिसरात आणि भक्तांच्या मनामनात आणि कणाकणात त्यांचं वास्तव्य आहे,
भगवंत नामाच स्वरूप हे अधिष्ठान, अनुष्ठान,अनुसंधान,अनुराग,यावरच अवलंबून आहे जर अधिष्ठान असेल तर अनुष्ठान अनुष्ठान असेल तर अनुसंधान अनुसंधान असेल तर अनुराग आणि अनुराग असेल तर नामाचा उच्चार मनुष्याच्या वाणीत सतत येतो,ते अधिष्ठान सर्व संतांनी निर्माण करुन लोकांना ब्रह्मानंद मिळवण्यासाठी ही द्वार खुली करून दिली आहेत, संतांचे येणे जाणे हे त्यांच्या हातात असते पण मनुष्याचे येणे जाणे त्यांच्या हातात नसते, सध्याच्या कलियुगातील लोकांमध्ये साध्याची निश्चिती आहे पण साधन काय करायचे माहिती नाही,आणि कोणाला साध्याची निश्चिती आहे पण साधन काय करायचं याची माहिती नाही,यावर सुंदर दृष्टांत देत,चार भिंतीचे संतांचे घर नाही,हे विश्वची माझे घर अशा या घरात ते कशासाठी आले,त्या घराचा पत्ता कोणता,तिथं जाण्यासाठी काय करायचं,हे फक्त आणि फक्त सगुणाच्या नामस्मरणाच्या जोरावरच निर्गुण निराकारकडे जाता येत असताना मनुष्याने सतत काम करत करत नामस्मरण केले पाहिजे,नुसती घर मोठी असून उपयोग नाही तर घराबरोबर मनुष्याची मनही मोठी असली पाहिजेत पण सध्याच्या काळात मन खुजी होत चाललेली दिसून येत आहे,मुखी नाम हाती मोक्ष या संत वचनांनी संतांनी मोक्ष प्राप्ती केली तीच सर्वांनी करावी असं तळमळीने सांगितले आणि ते फक्त आणि फक्त संतच सांगू शकतात, दृष्टीकोणाचा बदल म्हणजेच मोक्ष,आणि भगवंताचा सहवास लाभणे म्हणजे आयुष्यातील भय नाहीसे होणे होय,भगवंताचे नाम असे आहे,की कितीतरी वेळा घेतले तरी ते घेऊच वाटते,अमृताहूनी गोड नाम तुझे देवा, पण आपल्याला एकसारखे जेवण सुध्दा दररोज चालत नाही ही वस्तुस्थिती आहे,भगवंताची नाव जरी वेगवेगळी असली तरी सर्वांची तत्व एकच आहेत ज्याप्रमाणे नद्या वेगवेगळ्या असल्यातरी समुद्रालाच मिळतात तस नाम कसेही घेतल तरी ते भगवंतापर्यत पोहचतेच पण त्यासाठी अधिष्ठान पाहिजे, एखादा आनंदाचा क्षण कायमस्वरूपी राहत नाही तो प्रपंच आणि एखादा आनंदाचा क्षण अनुभव कायमस्वरूपी मनाला उर्जा देतो तो परमार्थ,माऊलींचा आणि अनेक संताचा पालखी सोहळा कायम आनंदच देतो, त्याप्रमाणे संत जरी वरुन भोळे दिसत असले तरी त्यांनी कळीकाळाला जिंकले आहे त्यासाठी संतांनी निर्माण केलेल्या मार्गाने जाऊन आयुष्याचे कल्याण करा सांगितले.
यावेळी करकंब व करकंब पंचक्रोशीतील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते,बजरंग तात्यांचे समाधी मंदिर बांधकामासाठी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने अर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
सुदाम महाराज पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिष्य परिवाराच्या वतीने सर्व करकंबकरांना अभिमान वाटावा अशा सप्ताहाच सुंदर नियोजन असून पुढील चारही दिवस सर्व भाविक भक्तांनी यांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री सिध्दनाथ मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.

