पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपुरात लाखो भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. यात्रा संपल्यानंतर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी पंढरपूर घडविण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने महास्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत नगराध्यक्षा डॉ.प्रणिताताई भागीरथ भालके यांनी स्वतः सहभागी होत स्वच्छता कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविला आणि शहरातील स्वच्छता व्यवस्थेची पाहणी केली.
यात्रेनंतर 65 एकर परिसर, शहरातील प्रमुख रस्ते, मंदिर परिसर, घाट परिसर व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करून कचरा हटविण्यात आला.
“स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर” हा संकल्प घेऊन शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.


