भारतातील सुप्रसिद्ध सुदर्शन न्युज या राष्ट्रीय चॅनलचे चेअरमन व सुदर्शन न्युज चे प्रधान संपादक श्री सुरेशजी चव्हाणके हे दिनांक 26 व 27 रोजी पंढरपूर येथील आमच्या जुन्या कासेगाव रोडवरील"मंचरी"या निवासस्थानी वास्तव्यास होते.
त्यांनी दिनांक 27 जून रोजी सकाळी फड परंपरेतील प्रसिद्ध असलेल्या तसेच श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या रथापुढे प्रथम क्रमांकाचा मान असलेल्या आमच्या वासकर वाड्यास सदिच्छा भेट दिली. यावेळी अॅड. ह.भ.प प्रसाद वासकर व आमच्या कुटुंबाने त्यांचा यथोचित सन्मान केला.
सुदर्शन न्युज चे सर्वेसर्वा सुदर्शन न्युज चैनल प्रखर हिंदुत्ववादी चैनल म्हणून सर्वश्रुत म्हणून केंद्रातील आणि उत्तर प्रदेश च्या हिंदुत्ववादी सरकारने सुरेश जी चव्हाणके यांना अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी असणारी वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे.
आमच्या वाड्यात आल्यानंतर त्यांनी येथील वासकर फडाच्या रूढी परंपरा तसेच वाड्याचा प्राचीन इतिहास जाणून घेतला. वासकरांची ही अकरावी पिढी सुद्धा रुढी व परंपरांचे जतन करत असल्याने त्यांनी संपूर्ण कुटुंबाचे कौतुक केले व त्यांना त्यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी येण्याचे आग्रहाचे आमंत्रण दिले. परंपरा व नित्यनियम पाहून ते भारावून गेले. त्यांनी खूप कौतुक केले. शिवाय त्यांनी हरिभक्त परायण राणा महाराज वासकर यांचीही त्यांच्या चॅनलसाठी "चलते _चलते"या एपिसोड करिता मुलाखत घेतली,तसेच येथील वारकरी संप्रदाय पाईक संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते हरी भक्त परायण रामकृष्ण वीर महाराज यांचीही त्यांनी भेट घेतली
सुदर्शन न्युज टीमने आमच्यासह श्री विठ्ठल रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेतले,यावेळी पंढरपूरचे त्यांचे रिपोर्टर रामेश्वर कोरे ही सोबत होते तसेच आषाढी सोहळ्याची त्यांनी माहिती करून घेऊन या सोहळ्याचे खूप कौतुक केले .आषाढी यात्रा कालावधीतील नवमीचा दिवशी त्यांचे दर्शन झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. सुदर्शन न्युज चॅनलची टीम आमच्या "मंचरी" या निवास स्थानी तीन दिवस वास्तव्यास होती. त्यांनी निवासस्थानाचे कौतुक केले व वासकर कुटुंबीयांना मनापासून धन्यवाद दिले.
सौ.मनीषा प्रसाद वासकर

