पनवेल प्रतिनिधी
"संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!"
आदर्श शैक्षणिक समूह संचलित श्री.बापूसाहेब डी. डी. विसपुते स्कूल अँड कॉलेज,नवीन पनवेल व पदवीधर प्रकोष्ठ भाजपा,महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने कु.धनश्री धनराज विसपुते यांच्या वाढदिवसानिमित्त व वन सप्ताहाचे औचित्य साधून शनिवार दि.१ जुलै २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा.श्रीम.वैशाली अशोक गलांडे, पोलिस निरीक्षक खांदेश्वर पोलीस स्टेशन,डॉ. नरेंद्रकुमार दसरे, तसेच ऑनलाईनच्या माध्यमातुन धनराजजी विसपुते, चेअरमन आदर्श शैक्षणिक समूह, संगीताजी विसपुते, संचालिका आदर्श शैक्षणिक समूह, कु.धनश्री धनराज विसपुते एम.एस (नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटी बोस्टन) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तसेच आदर्श शैक्षणिक समूहाच्या सर्व विभागाचे प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महाविद्यालयाच्या प्रांगणात उपस्थित होते.
सर्वात प्रथम सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर कु.धनश्री धनराज विसपुते यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मान्यवरांच्या हस्ते केक कटिंग करण्यात आले.
प्रमुख अतिथी श्रीम.वैशाली गलांडे यांनी आदर्श शैक्षणिक समूहाने केलेले विविध सामाजिक उपक्रमांची स्तुती केली तसेच महिलांच्या समस्येसाठी किंवा विद्यार्थ्यांच्या समस्येसाठी मी सदैव सहकार्य करेन असे आश्वासन दिले.तर आदर्श समूहाचे चेअरमन श्री.धनराजजी विसपुते यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या .श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. मान्यवरांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


