सोलापूर प्रतिनिधी
दिनांक 14 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत 62 व्या आंतरराष्ट्रीय सुब्रोतो कप फुटबॉल (सबज्युनिअर / ज्युनिअर) क्रीडा स्पर्धा सन 2023 चे आयोजन करण्यात येत असून, या राष्ट्रीय स्पर्धेच्या प्रवेशिका दिनांक 14 जुलै पर्यंत क्रीडा अधिकारी कार्यालय कुमठा नाका सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत जमा करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे,
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुब्रोतो मुखर्जी स्पोटर्स एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली व्दारा सन 2023-24 या वर्षात 62 वी आंतरराष्ट्रीय सुब्रोतो कप फुटबॉल (सबज्युनिअर / ज्युनिअर) क्रीडा स्पर्धा सन 2023 चे आयोजन करण्यात येणार आहे. सदर राष्ट्रीय स्पर्धा दिनांक 14 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत 14 वर्षाखालील मुले (सबज्युनिअर ) या वयोगटाच्या स्पर्धा बंगळूर या ठिकाणी होणार आहेत व 17 वर्षाखालील मुले / मुली (ज्युनिअर) या वयोगटाच्या स्पर्धा दिल्ली येथे आयोजित होणार आहेत.
सदर स्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडूंसाठी जन्म तारखेनुसार वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे.
वयोगट -14 वर्षाखालील मुले (सबज्युनिअर) दिनांक 01 जानेवारी 2010 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.
17 वर्षाखालील मुले/मुली (ज्यूनिअर) दिनांक 01 जानेवारी 2007 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.
जिल्हास्तर सुब्रोतो फुटबॉल कप क्रीडा स्पर्धाचा कार्यक्रम खालील प्रमाणे – वयोगट -14 वर्ष मुले व 17 वर्ष मुली- स्पर्धा कालावधी - दिनांक 18 ते 19 जुलै 2023. – 17 वर्षे मुले- दिनांक 19 ते 20 जुलै 2023
स्पर्धा उपस्थिती - दिनांक 18.07.2023 रोजी सकाळी 9.00 वा -14 मुले व 17 मुली . स्पर्धा उपस्थिती - दिनांक 19.07.2023 रोजी सकाळी 9.00 वा.- 17 वर्षे मुले. स्पर्धा स्थळ- शासकीय मैदान नेहरु नगर विजापूर रोड सोलापूर.
संपर्क क्रमांक- श्री. गणेश पवार राज्य क्रीडा मार्गदर्शक मो.नं 9970095315 श्री. किरण दुस्तकर मो.नं 8788192124 संघटना प्रतिनिधी .
तरी या कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाळा/महाविद्यालये मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक यांनी आपल्या शाळेचे संघ निवड करुन सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता www.subrotocup.in या संकेत स्थळावर खेळाडू व संघाची नोंदणी करणे अनिवार्य आहे.


