मुंबई प्रतिनिधी
गुरुपौर्णिमा या शुभदिनी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता हार्दिक जोशी, अभिनेत्री आदिती सारंगधर, अभिनेता माधव देवचाके, अभिनेता अमोल नाईक, अभिनेता प्रतीक पाटील यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुखमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेना ही कामयच मराठी कलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभी असून चित्रपट क्षेत्रातील कलाकार आणि काम करणारे तंत्रज्ञ यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठीच शिवसेना चित्रपट सेनेची स्थापना करण्यात आली असून, चित्रपट सृष्टीतील कामगार, तंत्रज्ञ, यांचेही प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
याचवेळी शिवसेना प्रणित शिव चित्रपट सेनेच्या नवीन लोगोचे अनावरण देखील करण्यात आले.
याप्रसंगी खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रकाश सुर्वे, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के, शिवसेना सचिव सुशांत शेलार तसेच चित्रपट सेनेच्या पदाधिकारी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हेदेखील उपस्थित होते.

