पंढरपूर प्रतिनिधी
कामिका एकादशीचे औचित्य साधून सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल भाऊ कोकीळ हे सोलापूर जिल्हातील गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक या मोहीमच्या निमित्त संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करत असताना आज माढा तालुक्यातील मोडनिंब येथे जात असताना श्री विठ्ठल मंदिराचे प्रदक्षिणा करीत असताना श्री नामदेव महाराजांचे वंशज यांच्या दिंडीची चौफाळा येथे भेट झाले.
सदर दिंडीमध्ये श्री संत नामदेव महाराजांचे सोळावे श्री नामदास महाराज यांनी कोकीळ व मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांना पाहिल्यानंतर प्रदक्षिणेला चाललेल्या दिंडीमध्ये सहभागी करून घेतले व व श्री विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्याच्या अगोदर श्री विठ्ठलाचे नामस्मरण ऐकण्याचा व करण्याचा दुग्ध शर्करा योग या निमित्ताने अनुभवास मिळाला तसेच तदनंतर आम्हास आरतीचा सन्मान देण्यात आला.
यानिमित्ताने आम्ही धन्य धन्य झालो आणि तिथून श्री विठ्ठलाच्या दर्शनाकरिता मंदिराकडे मार्गस्थ झालो श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेलो असता श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस साकडे घातले बा पांडुरंगा राज्यावर पाऊस नसल्याने आलेले संकट लवकर दूर कर व बळीराजा सुख सुखी होऊ दे व सर्व शेतकरी बांधवांमध्ये सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीशी सदैव आपल्या आशीर्वादासह राहू दे अशी प्रार्थना केली.
यावेळी प्राध्यापक लक्ष्मण हाके शिवसेना प्रवक्ते व शिवसैनिक उपस्थित होते.

