सोलापूर प्रतिनिधी
रविवार दिनांक 2 जुलै 2023 रोजी गुरुपौर्णिमा निमित्त डिग्री कॉलेज ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस व फाईन आर्ट,गुरुकुल कॉम्प्युटर्स व चाणक्य गुरुकुल अकॅडमी कडून दक्षिण सोलापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र धोत्री येथील श्री. भगवती गौरीमाता प्रशाला,कनिष्ठ महाविद्यालयातील इतिहास, राज्यशास्त्र व समाजशास्त्र विषयाचे ज्येष्ठ प्राध्यापक श्री.स्वामीनाथ सिद्धप्पा कलशेट्टी( शिंगडगावकर) यांना इंडियन मॉडेल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.अमोल.डी. जोशी सर यांच्या शुभहस्ते,सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.इरेश स्वामी सर यांच्या अध्यक्षतेखाली आदर्श गुरुवर्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.इतिहास अभ्यासक, व्याख्याते, निरुपणकार, पर्यावरण प्रेमी,पालक विद्यार्थीप्रिय,जेष्ठ प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी सरांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे आजपर्यंत त्यांना एकूण 96 हून अधिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे.
प्राध्यापक कलशेट्टी सरांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये नामवंत पदावर कार्यरत आहेत.परमपूज्य श्री होटगीश्वर स्वामींजींचा कृपा आशीर्वाद सदैव त्यांच्यावरआहे. सरांच्या गौरवामुळे श्री.काशीपीठाचे जगद्गुरु श्री.श्री.श्री1008 ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्री बृहन्मठ होटगी मठाचे अध्यक्ष श्री. बाल तपस्वी चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामींजी शुभाशीर्वाद दिले.
संस्थेचे सचिव मा.श्री.शांतय्या स्वामी सर,सर्व पदाधिकारी,प्राचार्य, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक. पर्यवेक्षक,प्राध्यापक,शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, मित्रपरिवार समस्त ग्रामस्थ आदिनीं मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन, कौतुक करून अशीच यशस्वी वाटचाल यापुढील काळात होत राहो अशी सदिच्छा व्यक्त केले.

