सोलापूर प्रतिनिधी
लायन्स इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर ट्विन सिटीच्या वतीने एक जुलै डॉक्टर डे व सीए डे याचे औचित्य साधून आज हॉटेल व ऐश्वर्या सोलापूर येथे नवनिर्वाचित उपविभागीय सभापती लायन अमित धुपत यांच्या हस्ते व अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे खजिनदार राजेश परसगोंड व नवनिर्वाचित नियुक्त अध्यक्ष अभियंता रविकिरण वायचळ सचिव अभियंता गणेश दंतकाळे खजिनदार प्रभाकर जवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला .
सोलापूर महानगरपालिका सोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माजी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संस्कृती वळसंगकर व अभाश्री क्लिनिकचे डॉक्टर महांतेश स्वामी आणि सोलापुरातील नामवंत सनदी लेखापाल सीए. सुदर्शन पुकाळे यांचे उत्कृष्ट डॉक्टर व सीए म्हणून शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ला. नागेश बुगडे, ला. ममता बुगडे, ला. ज्ञानेश्वर कुलकर्णी, ला. सोमशेगर भोगडे इत्यादी जण उपस्थित होते.


