एकास अटक, एक फरारी एकास चार दिवसाची पोलीस कस्टडी
माळशिरस तालुका प्रतिनिधी जयराम घाडगे
वेळापूर तालुका माळशिरस येथे वेळापूर पोलिसांनी गावठी पिस्तूल बाळगण्या प्रकरणी एकास अटक करून त्याला चार दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
या घटनेची वेळापूर पोलीस स्टेशनला दीपक श्रीरंग नवले पोलीस कर्मचारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वेळापूर पोलीस स्टेशनला नोंद झाली आहे. याबाबतचे अधिक वृत्त असे की पोलीस कर्मचारी दीपक नवले यांनी दिलेले फिर्यादी मध्ये म्हटले आहे, मला वेळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारांची माहिती असून यामधील अवधूत नारायण शेंडगे राहणार पिसेवाडी व हरिदास नागनाथ जाधव राहणार खंडाळी यांच्यावर कुंडलिक पांडुरंग शिंदे राहणार दसुर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १५३/२०२३ भादवि कलम ३२६ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात अवधूत शेंडगे हा जामीनावर मुक्त असून हरिदास जाधव याचा पोलीस तपास करीत आहेत. या प्रकारात सदर कुंडलिक शिंदे यास गंभीर मारहाण करून त्याचा हात फ्रॅक्चर केल्यामुळे तो अवधूत शेंडगे व हरिदास जाधव यांच्यावर चिडून होते.
दिनांक ८/७/२०२३ रोजी रात्री ८.१५ च्या सुमारास मी पोलीस उपनिरीक्षक संजय रेगुडे, पोलीस नाईक आनंदपुरे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल कांबळे असे पोलीस ठाण्यात हजर असताना वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागवे यांनी सांगितले की वेळापूर येथील गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार वेळापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 153 / 2023 भादवी कलम 326 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी हरिदास जाधव राहणार खंडाळी हा त्याचे मित्र अवधूत शेंडगे राहणार पिसेवाडी यांच्यासह चार चाकी कार मधून येऊन दोघे पोरे कॉम्प्लेक्स दुकानासमोर रोडवर थांबले असल्याची माहिती वेळापूर पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव व पोलीस कर्मचारी सर्वजण खाजगी वाहनाने वेळापुरे कॉम्प्लेक्स येथे आले असता तेथे चार चाकी वाहन नंबर एम एच 11 एके 83 35 या वाहनाजवळ माझ्या ओळखीचे अवधूत नारायण शेंडगे राहणार पिसेवाडी व हरिदास नागनाथ जाधव राहणार खंडाळे असे थांबलेले दिसले.
त्यावेळी सर्व पोलीस त्यांच्याकडे जात असल्याचे पाहून हरिदास जाधव हा अंधाराचा फायदा घेऊन महादेव मंदिराकडे जोरात पळून गेला व अवधूत शेंडगे यांनी अचानक त्यांच्या पॅन्टच्या खिशातून हात घालून एक लोखंडी गावठी पिस्तूल मिळून आले त्यावेळी तत्काळ प्रभारी अधिकारी निलेश बागाव व पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ अवधूत शेंडगे यांच्या जवळ जाऊन त्यास पकडून त्याच्या हातातून पिस्टल काढून त्याला ताब्यात घेतले रात्री ८:३० सुमारास त्याला गावठी पिस्तूल मॅक्झिन, चार चाकी वाहन दोन जिवंत राऊंडर, २८ हजाराची एक लोखंडी गावठी पिस्टल मॅक्झिन, व २ लाख रुपयांची मारुती सुझुकी कार असे एकूण २ लाख २५ हजार रुपयांच्या मुद्देमाल सह अवधूत शेंडगे यास ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपीवर सोलापूर जिल्ह्याचे एसपी शिरीष सरदेशपांडे ॲडिशनल एस पी हिम्मत जाधव डी वाय एस पी सई भुरे पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली
याची वेळापूर पोलीस स्टेशनला नोंद झाली असून यामध्ये संबंधित अवधूत शेंडगे यास माळशिरस न्यायालयासमोर उभे केले असता त्यास न्यायालयाने ४ दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. याचा अधिक तपास वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव हे करीत आहेत.

