पंढरपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे , श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व मुख्यमंत्री कार्यालयाचे OSD आमचे गुरुवर्य मंगेश चिवटे व मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्ष प्रमुख राम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वरील पालखी सोहळा दरम्यान पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना पंढरपूर मधील डॉक्टरांकडून मेडिकल डिस्ट्रीब्युटर्स कडून मोफत औषध वाटप करण्यात आले.
तसेच या पालखी सोहळ्यातील महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन सुदर्शन चैनल न्यू दिल्ली चे मालक सुरेश चव्हाणके व पंढरपूर तालुका शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका समन्वयक व नेहमी गोरगरिबांच्या रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर उभे राहणारे मनीषा ताई वासकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले.
या शिबिराचे संपूर्ण आयोजन बारामती तालुक्यातील लिमटेकचे सतीश महादेव गावडे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सतीश गावडे व बारामती तालुका समन्वयक श्री मंगेश खताळ व बारामती वैद्यकीय टिमचे पदाधिकारी उपस्थित होते.