या वर्षी आषाढी वारीला जाण्यासाठी योग आला. देवाक काळजी रे, देवाक काळजी.
यावर्षीसुद्धा पांडुरंगाने मलाही दिंडीतून बोलावले होते.आणि ते सुद्धा गोंदवले येथून महाराजांनी सुखरूप नेले आणि घरपोच केले. ही किमया त्यांनी माझ्याकडून तिसऱ्यांदा करवून घेतली. कृतार्थ झालो.
न उलगडलेले कोडे आहे हे..एवढा उत्साह कसा आणि कोठून येतो हेच कळत नाही. कारण सरिता (सौ ) यावर्षी पहिल्यांदाच माझ्या बरोबर दिंडीला येणार म्हणाली, मी जरा साशंकच होतो बहुदा निम्यातून परत यावे लागणार. पण असे काही झाले नाही...ध्येय डोळ्यसमोर ठेवले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही कारण त्याला आध्यत्मिक सुद्धा आधार असावा लागतो आणि पांडुरंगाने आम्हा दोघांची वारी सहज करून घेतली. अबालवृद्ध यांना सामावून घेणारे वारकरी, जेथे मुक्काम असेल तेथे असेल त्या परिस्थितीत राहणे... गार पाण्याने आंघोळ या सर्वांची सवय होऊन जाते..आणि सर्व वारकरी, माऊली एकच आहेत. कोणत्या वर्गाचा, कोणती नोकरी करणारा असा काहीच भेद नाही.
म्हसवड, पिलीव, भाळवणी आणि पंढरपूर असा आमचा मुक्काम होता. म्हसवड येथे सोय होणार नाही म्हणून श्री महाराज यांनी आम्हाला परत या म्हणून सांगितले आणि आम्ही तसे केले 24.6.23 चा मुक्काम आम्ही गोंदवले येथे करून परत वारीमध्ये सामील झालो. पिलीवमधून मुकुंद देशपांडे यानी भाळवणीला मुक्कामी बोलावले.मुकुंद देशपांडे यांची मुलगी ऐश्वर्या वीणा ची मैत्रीण नंतर आम्ही नातेवाईक निघालो. दुसरेदिवशी पुन्हा पिलीव आणि परत भालवणी आमचे परम मित्र प्रशांत मालवदे..की जे तेज न्यूज चॅनेल चालवतात..आणि लीडिंग चे रिपोर्टर आहेत त्यांनी सलग तिसऱ्या वर्षी सुद्धा माझ्याकडे यायचंच म्हणून आग्रहाचे निमंत्रण दिले..आणि पंढरपूर मध्ये सारंग चे मित्र सुरज चांदोले याचे आई वडिल यांनी केलेले स्वागत विसरू शकत नाही.
कळस दर्शन घेऊन एकच मागणे मागितले, पांडुरंगा मला पुढच्या वारीलासुद्धा असेच बोलव.
राम कृष्ण हरी!!
श्रीपाद ताडे ,सातारा