मारापुर प्रतिनिधी
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार समाधानदादा आवताडे यांच्या प्रयत्नांतून व मारापूर नगरीचे लोकनियुक्त सरपंच विनायकराव यादव यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत माने वस्ती-आसबे वस्ती शाळा रस्ता(जुना गुंजेगाव ते मंगळवेढा रस्ता) सुधारणा या विकासाभिमुख कामाचा शुभारंभ युवक नेते सोमनाथ आवताडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
विकासात्मक बाबींच्या मुद्द्यावर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये लोकजनाधार प्राप्त करुन सर्वसामान्यांच्या रस्ते,वीज,पाणी, शिक्षण व आरोग्य या मूलभूत व पायाभूत धोरणांच्या कार्य साधनेला प्राधान्य देणारे गावचे लोकनियुक्त कारभारी म्हणून सरपंच महोदय यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. कोणत्याही प्रकारचा राजकीय अथवा वैयक्तिक आकस मनात न ठेवता सामान्यांच्या परिवर्तनवादाची नांदी अधोरेखित करणारे सरपंच यादव या भागातील जनतेच्या उज्वल आणि आश्वासक नेतृत्वाचा ठेवा असल्याचे सभापती आवताडे यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच अशोक आसबे, माजी सरपंच भगवान आसबे, माजी संचालक श्री.भुजंगराव आसबे,माजी उपसरपंच मा.सुहास पवार, बापू आसबे, राजाराम आसबे, आमोल जानकर, नंदकुमार आसबे, आनिल माने,तानाजी आसबे, बंडू आसबे, रामचंद्र आसबे, आर्जून यादव, आदी मान्यवर, सर्व आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,सोसायटी सदस्य व आसबेवाडी (मारापुर) येथील ग्रामस्थ मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.