पंढरपूर प्रतिनिधी
आज दिनांक ८ जुलै 2023 रोजी शिवसेना पक्षाची मुलुख मैदानी तोफ शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनाचे संपादक व राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी सहपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
त्यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, शिवसेना जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग व मंदिरे समिती सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा उपरणे व दैनंदिनी देवून सत्कार करण्यात आला.
त्यावेळी आमदार सुनील राऊत व मल्हार नार्वेकर तसेच तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी मंदिरे समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.

