सोलापूर प्रतिनिधी
आषाढी एकादशीचा आनंद सोहळा श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे दिनांक 28 जून रोजी आनंदात साजरा झाला. विठ्ठल रखुमाई, संतांचा पोशाख धारण केलेले आणि हातात दिंड्या पताका घेऊन नाचणारे चिमुकले वारकरी, नामाचा गजर आणि एकंदर उत्साह पूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी मराठी विभागाकडूनही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये दहावी व नववीच्या विद्यार्थ्यांचे अभंग गायन, अक्षरा पाटणकर हिने सादर केलेली गवळण, संस्कृती गवंडी हिचे भारुड सादरीकरण तसेच जयवर्धन गवळी याने सांगितलेली ज्ञानेश्वरांची माहिती व सहावी आणि सातवी च्या विद्यार्थ्यांचे भक्ती गीत गायन इत्यादी कार्यक्रमांचा अंतर्भाव होता. सदर कार्यक्रमासाठी श्री सिद्धेश्वर प्रशालेचे मराठी व संस्कृत विभागाचे श्री. समन सर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली .
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक श्री. योगेश राऊत सर व सुपरवायझर श्री. शिवराज बिराजदार सर यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व तयारी करून घेण्यासाठी मराठी विभाग प्रमुख सौ नीता तमशेट्टी, सौ.विजया बिराजदार, सौ.अंजली खानापूरे व सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.विजयालक्ष्मी नष्टे व सदस्य श्रुती कुलकर्णी, मृणाल शेंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.