सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालया तील इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी मधील बनवली विद्यार्थ्यांनी सौरऊर्जा ई - सायकल,बाजारात विविध प्रकारच्या सायकली उपलब्ध आहेत जसे की सामान्य सायकल ज्यांना चालवण्यासाठी लोकांना पॅडल मारावे लागतो,
तर दुसरी मोटर व्दारे चालविली जाते व जी ऊर्जा स्त्रोत म्हणून इंधन वापरले जाते आणि बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक सायकल,परंतु या सर्वांमध्ये काही तोटे आहेत त्यामुळे या त्रुटींवर मात करण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करून दीर्घकाळ चालणारी सायकल बनवण्याची कल्पना विद्यार्थांना सुचली आणि ती डिस्चार्ज झाल्यावर स्वतः रिचार्ज होईल. सौर पॅनेल सूर्यापासून ऊर्जा शोषून घेऊन नंतर बॅटरी चार्ज होईल. या ई-सायकलला जास्त मानवी शक्तीची आवश्यकता नाही आणि ती चालवणे सोपे आहे. ई-सायकल हा केवळ स्वस्त पर्याय नाही तर पर्यावरण पूरक देखील आहे कारण ती कोणत्याही हानिकारक वायूंचे उत्सर्जन करत नाही आणि पर्यावरण प्रदूषित ही करत नाही. आज जगात सर्वत्र दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान वापरण्यासाठी भरभराट होत आहे, इलेक्ट्रिक वाहन हे वाहतुकीचे भावी साधन आहे.
यामध्ये 36 व्होल्ट 10 अंपियर लिथियम आयन बॅटरी आणि 36 व्होल्ट कंट्रोलर आणि 10 वॅट 2 सोलर पॅनेलसह 36 व्होल्ट 350 वॅट हब मोटर वापरली आहे. एक सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन जे ई सायकलचे विविध पॅरामीटर्स जसे की स्पीड, रेंज इ. वापरले आहे. ही सौरऊर्जा ई- सायकल बनवण्यासाठी नेहा बनसोडे, स्वाती दर्गोपाटील, स्वराली मैत्री, प्रियांका सुरवसे, निरंजन चव्हाण, प्रथम अडसुळे, मेघा गायकवाड यांनी परिश्रम घेतले व प्रा. अमोल क्षीरसागर यांनी यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या सर्व विद्यार्थ्यांचे सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, महाविद्याल याचे प्राचार्य डॉ. शंकर नवले,उपप्राचार्य डॉ रवींद्र व्यवहारे व डॉ. शेखर जगदे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.