पंढरपूर प्रतिनिधी
बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाच्या युवासेना तालुका प्रमुखपदी पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील महादेव भोसले यांची निवड करण्यात आली.
महादेव भोसले यांना निवडीचे पत्र शिंदे गट शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी उपजिल्हाप्रमुख महावीर देशमुख, दिपक सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी बागल, तालुका प्रमुख शिवाजी बाबर, जिल्हा संघटक संजय बंदपट्टे, शहराध्यक्ष विश्वजीत भोसले, महिला आघाडी च्या मुबीना मुलाणी , मोहोळ तालुकाप्रमुख प्रशांत भोसले, मंगळवेढा युवासेना प्रमुख प्रतीक किल्लेदार, महादेव गोडसे, युवासेना शहरप्रमुख सुमित शिंदे, साईनाथ बडवे, उपतालुका प्रमुख विजय करपे, गणपत कौलगे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी सांगितले की, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन वाढविण्याबरोबरच सामान्य माणसांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहीले पाहीजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण होणार्या योजना व उपक्रम समाजातील तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी उत्तम काम करावे असे सांगितले.
याप्रसंगी शाखाप्रमुख बाळासाहेब गणगे , नंदु खरे, ऋषीकेश भोसले, नितीन गुरव, विशाल आदमिले, गणेश वसेकर, बळीराम लोखंडे, लक्ष्मण माळी , पांडुरंग रोकडे, सुधीर भोसले, समाधान भोसले, वैभव भोसले, पवन माने, सुधीर गणगे, अनिल जाधव, अक्षय सुतार, सतीश भोसले, रणजित बिस्कीटे, सदाशिव खरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
चांगल्या कार्याने विश्वास सार्थ करू......
पक्षातील वरीष्ठ पदाधिकार्यांनी जो विश्वास टाकला आहे. तो विश्वास चांगल्या कार्यातून आणि पक्ष संघटन मजबूत करून सार्थ ठरविणार आहे. त्यासाठी पक्षातील वरीष्ठ पदाधिकार्यांचे मार्गदर्शन व सहकारी पदाधिकार्यांचे सहकार्य घेवून चांगल्या स्वरूपाचे कार्य करणार आहे.
महादेव भोसले
युवासेना, तालुकाप्रमुख , पंढरपूर