प्रतिनिधी नवी मुंबई सुभाष हांडे देशमुख
कोपरगाव येथील शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेत शिकणारा दर्शील वीरेश गवारे पाटील या विद्यार्थ्याने नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत ७१.६० टक्के गुण मिळवून चांगले यश संपादन केले आहे.
वडिलांबरोबर वडिलोपार्जित असलेला शालेय साहित्य व इतर साहित्य असलेल्या दुकानाच्या व्यवसायात दररोज सातत्याने मदत करुन त्याचबरोबरीने क्रिकेट, फुटबॉल असे मैदानी खेळांचेही छंद जोपासत दर्शील याने मोठ्या जाणिवेने अभ्यास केला व चांगल्या गुणांनी पास झाला आहे. कष्टपूर्वक स्वतःचा सर्वांगीण विकास साधून, वडिलांनाही व्यवसायात मदत करत चांगले गुण मिळवून यशस्वी झाल्याने शाळेतील शिक्षकांबरोबरच, मित्रमंडळी तसेच नातेवाईकांकडूनही त्याचे अभिनंदन केले जात आहे.