जोगेश्वरी प्रतिनिधी उदय वाघवणकर
रविंद्र दत्ताराम वायकर शिवसेना आमदार यांच्या सहकार्याने व श्री स्वामी सेवक श्री संजय वेंगुर्लेकर (ठाणे) यांनी जतन केलेल्या श्री स्वामी समर्थांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे दर्शन घेण्याचे अहोभाग्य जोगेश्वरी (पुर्व) विभागातील तसेच मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्य़ातील स्वामी भक्तांना लाभले.
समर्थांच्या विविध लीलांची माहिती, श्री क्षेत्र अक्कलकोट मधील ११ मारुती मंदिर, श्री स्वामी समर्थांचे ३५ प्रमुख शिष्य, स्वामींच्या स्पर्शाने पावन झालेल्या वस्तूंचे, पादुकांचे, लीलास्थळांचे फोटो तसेच विविध नामांकित श्री गणेशांची माहितीसह छायाचित्रे हा समग्र दर्शन सोहळा अनुभवण्यास मिळाल्यामुळे आम्ही भारावून गेल्याची प्रतिक्रिया भक्तांनी व्यक्त करुन आयोजकांचेही आभार मानले.
श्री स्वामी सेवक श्री संजय वेंगुर्लेकर यांनी त्यांच्या सत्कार समारंभात आपल्याला जोगेश्वरी विभागात स्वामी भक्तांसाठी श्री. स्वामी समर्थ समग्र दर्शन सोहळा आयोजित करण्यास विनामूल्य सहकार्य केल्याबद्दल रविंद्र दत्ताराम वायकर शिवसेना आमदार व स्वर्गीय द. गो. वायकर स्मृती ट्रस्ट संचालित इच्छापूर्ती गणेश मंदिर यांचे आभार मानून लवकरच आपण याच ठिकाणी महाराष्ट्रातील दुर्मिळ १२१ श्री गणेशांची छायाचित्रांसह माहिती दर्शन सोहळ्याचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.