पंढरपूर प्रतिनिधी
श्री.रुक्मिणी विद्यापीठ संचलित मातोश्री ईश्वराम्मा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पंढरपूर या प्रशालेत सन २०२३-२०२४या शैक्षणिक वर्षातील नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करताना प्रथम शिक्षण गंगोत्री सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.तर विद्यार्थ्यांना प्रशालेची माजी विद्यार्थीनी डेंटिस्ट प्राजक्ता निर्मळ.यांचे शुभहस्ते पुष्पगुच्छ, पुस्तक व अल्पोपहार देऊन तसेच घोडेस्वारी करुन करण्यात आले.या वेगळ्या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला होता.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.प्राजक्ता निर्मळ म्हणाले की आपण स्वतःच्या सर्वांगीण विकासात आपल्या शालेय गुरुंचे योगदान व त्यांची मिळालेली प्रेरणा महत्वाची असते.विद्याथीदशेतच मुलांनी अवांतर वाचनाची आवड निर्माण करून घ्यावी.यासाठी मुलांनी आपापल्या घरी ग्रंथालय सुरू करावे असे सांगत आपण वाचाल तरच टिकाव व जिवणात यशस्वी व्हाल असे सांगून बाह्य परीक्षांना प्राधान्य देऊन सर्व भाषांचे ज्ञान अवलोकन करण्याचे आवाहन केले.
तसेच कार्यक्रमासाठी प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सविता लोखंडे, संतोष कवडे, रुक्मिणी बँक संचालिका जयश्रीताई खडतरे यांचे सह प्रशालेचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभावरी डुबल यांनी केले तर आभार कुमुदिनी सरदार यांनी मानले.