भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमनी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त काळे गटाच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतलेली दिसून येत आहे.
प्रत्येक सभासदाच्या घरोघरी जाऊन मतपत्रिका देऊन कप बशीच्या चिन्हावर शिक्का मारण्याचे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पंढरपूर उपतालुकाप्रमुख प्रवीण शिंदे यांनी केले आहे.
यावेळी सभासदांना काळे गटाच्या कपबशीच्या चित्रावर फुलीचा शिक्का मारून प्रचंड अशा बहुमताने विजय करण्याचे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष सचिन भोसले यांनी केले.
यावेळी सभासद,कामगार,ग्रामस्थ आदि उपस्थित होते.