माळशिरस तालुका प्रतिनिधी जयराम घाडगे
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सदाशिवनगर येथे भव्य कब्बड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
एकविसाव्या शतकात तरुणाईमध्ये प्रचंड कला, क्रीडा, साहित्यिक गुण संपन्नता दिसून येत आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील तरुणांना देखील यासाठी वाव मिळाला पाहिजे, म्हणून आदरणीय विजय दादांच्या कल्पनेतील क्रीडा कब्बड्डी स्पर्धेचे आयोजन करून अनोख्या पद्धतीने सदाशिवनगर येथे माँ बाबासाहेब फाउंडेशन व साईराज क्रीडा मंडळ यांच्या वतीने करण्यात आले. या स्पर्धेचे उदघाट्न प्रथमता कै काकासाहेब व अक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून विधानसभा आमदार रामभाऊ सातपुते व विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, श्री शंकर सहकारी चे व्हा चेअरमन श्री. ॲड. मिलिंद कुलकर्णी बाळासाहेब सरगर, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, RPI चे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, पं स सदस्य माऊली पाटील, गणपतराव वाघमोडे, बाजीराव काटकर, अर्जुन धाईंजे, तानाजी पालवे, अनंतलाल दोशी, शिवामृत चे संचालक अरविंद भोसले, लक्ष्मण पवार, शरद साळुंखे, संदीप पाटील, दत्तात्रय चव्हाण, रामदास कर्णे, भगवान मिसाळ, नारायण सालगुडे पाटील, सुरेश मोहिते, सुनील माने, नंदन दाते, सरपंच राणी मोहिते, विष्णू घाडगे, विरकुमार दोशी, शिवाजी जाधव, दादा पाटील, देविदास ढोपे, शिवराज निंबाळकर, धर्मराज माने, तुकाराम चव्हाण, दादा पालवे, उदय धाईंजे, तानाजी ओवाळ, पोलीस निरीक्षक जहांगीर मुलाणी, तसेच माँ बाबासाहेब फाउंडेशन व साईराज क्रीडा मंडळ चे सदस्य, श्री शंकर सहकारी चे अधिकारी, कर्मचारी, सदाशिवनगर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ व खेळाडू संघ उपस्थित होते.