जोगेश्वरी प्रतिनिधी गणेश हिरवे
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख श्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ११ जून २०२३ रोजी वॉर्ड क्र ७४ चे उपशाखाप्रमुख रुपेश शेलार आणि युवासेनेचे विभाग युवा अधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारक अमित पेडणेकर, उपशाखा अधिकारी शुभम हेगिष्टे यांनी बालउत्साही क्रीडा मंडळाच्या सहकार्याने रविवार दिनांक ११ जून, २०२३;रोजी जोगेश्वरी पूर्वेकडील दत्त टेकडी येथील बाल उत्साही क्रीडा मंडळाच्या वास्तूमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
या शिबिरास आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभू यांनी भेट देऊन रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन अभिनंदन करून एका महत्त्वाच्या सामाजिक कार्याला हातभार लावून रक्तदान करून कुणाचे तरी प्राण वाचवण्याच्या कार्यात सहभाग घेतल्याबद्दल आभार मानले. या शिबिरात एकूण १०३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरास युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, मा. नगरसेवक प्रवीण शिंदे, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, उपविभाग प्रमुख के पाठक, उपविभाग समन्वयक महेश गवाणकर, उत्तरा नायर, शाखाप्रमुख नंदकुमार ताम्हणकर, मंदार मोरे, शाखा समन्वयक योगित पाटील, कार्यालय प्रमुख राजेंद्र पवार आणि युवासेनेचे समृद्ध शिर्के आणि युवासेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. बाल उत्साही क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांनी या शिबिराला यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.