भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक निमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने कल्याणराव काळे यांच्या पॅनलला जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे आज पाठिंबा देणार असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.
वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीच्या प्रसंगी शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते या साखर कारखान्याचे भूमिपूजन करण्यात आले होते त्यामुळे शिवसेना कायमस्वरूपी काळे यांच्या गटास सहकार्य करीत आलेली आहे यापुढे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काळे गटातून उभा करण्यात आलेल्या सर्व उमेदवाराला शिवसेना पंढरपूर विभाग यांच्या वतीने संभाजी शिंदे पत्रकार परिषद घेऊन जाहीर पाठिंबा देण्यात येणार आहे अशी माहिती समजली आहे.
यापूर्वीच शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी काळे गटास पाठिंबा दिला असल्यामुळे सगळ्यांच्या मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच संभाजी शिंदे यांच्या पाठिंबामुळे काळे गटास भाळवणी गटासह संपूर्ण तालुक्यात मतदानाचा फायदा होईल अशी चर्चा केली जात आहे.