भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील रविवार पेठेतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त शिवसेना पंढरपूर उप तालुकाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्या शुभहस्ते महापूजा संपन्न झाली.
यावेळी दादा आगलावे यांच्या हस्ते श्री चरणी वस्त्रदान करण्यात आले तर प्रसादाचे दान अमोल कारंडे यांनी केले.
यावेळी रवींद्र कारंडे, नाना जाधव,सुधीर गांधी, आनंद देशपांडे, अमोल लंगोटे, नामदेव बंडगर, सुनील माने, दगडू शिंदे, संतोष सावंत,गणेश मायणीकर,विठ्ठल लोखंडे, भाविक ,महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.