पंढरपूर प्रतिनिधी
शिवसेना सचिव मिलिंदजी नार्वेकर यांनी आषाढी यात्रेच्या निमित्ताने आज सपत्निक श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
त्यानंतर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने मिलींदजी नार्वेकर यांचा सत्कार मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहीनीनाथ महाराज औसेकर व संभाजी शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती यांच्या हस्ते “श्रीं” चे उपरणे व दैनंदिनी देऊन करण्यात आला.
त्यावेळी गितेश राऊत, अंकुश चव्हाण, श्रीरंग औसेकर महराज व मंदिरे समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर जळगांवकर महाराज व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.